सस्पेन्स संपला!राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष ठरला, लवकरच निवडीची घोषणा, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब?


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे जाणार याची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात होती.सुरुवातीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे यांच्या देखील नावाची चर्चा होती.
मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’पदी निवड होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आल आहे.येत्या १५ दिवसांत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

दरम्यान सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यांच्याकडे प्रशासकीय आणि राजकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता संघटनेचे सर्वोच्च पदही त्यांच्याकडे देऊन पक्ष पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

त्यानंतर दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सध्या दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून वेगवेगळी विधाने येत आहेत. मात्र आधी राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतरच विलीनीकरणाबाबतची पुढील चर्चा किंवा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!