सस्पेन्स संपला! पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष ‘पवार’च; सुनेत्रा पवारांच्या शपथेच्या दिवशीच ‘त्या’ पत्रावर सह्या..

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला आहे.आता सुनेत्रा पवार यांची वर्णी राष्ट्रीय अध्यक्ष पदी लागण्याची दाट शक्यता आहे. ‘पक्षाचा अध्यक्ष पवारच राहणार’ यावर आता शिक्कामोर्तब झाल आहे.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ नेतृत्वाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. सुनेत्रा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या दिवसापासून पक्षांतर्गत हालचालींना वेग आला होता.,
पक्षातील बहुतांश आमदारांनी सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करावे, अशी मागणी लावून धरली आहे. यासाठी आमदारांनी एक विशेष सह्यांची मोहीम देखील सुरू केली असून, आतापर्यंत ३० हून अधिक आमदारांनी सुनेत्रा पवारांच्या नावाला पत्राद्वारे पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवण्यासाठी ‘पवार’ हेच नाव अध्यक्षपदासाठी असणे गरजेचे असल्याचे मत वरिष्ठ पातळीवर निश्चित झाल्याचं एकमत झाले आहे.