वरिष्ठांचा त्रास असह्य ; पुण्यातील पोलिसाची भावनिक सुसाईड नोट व्हायरल


पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील एक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची घटना पुण्यात घडली होती. यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून आणि मुलीच्या वाढदिवसाला सुट्टी न दिल्याने पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी मी जीवाचे बरे वाईट करत असल्याची पोस्ट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली. त्यानंतर आता त्यांनी लिहलेली धक्कादायक सुसाईड नोट समोर आली आहे.

या सुसाई़ड नोटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे १ वर्षांपासून मानसिक त्रास देत आहेत. माझी सन २०२५ मध्ये शिक्रापूर पोलिस ठाण्यात सर्वसाधरण बदली झाली. परंतु, मला बदली ठिकाणी कार्यमुक्त न करता त्रास दिला जात आहे. सदर पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देऊन खच्चीकरण करत आहे. त्यामुळे देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस नारायण देशमुख जबाबदार आहेत.’ पोलिस नाईक निखिल रणदिवे यांची सुसाईड नोट समोर आल्यानंतर पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी व्हाट्सअपवर स्टेटस ठेवले आहे. त्या स्टेटस वर त्यांनी स्वतःच्याच फोटोवरच भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. रणदिवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुलीसाठी असे लिहिले आहे की, ‘माझी प्रिय दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार- पाच दिवसांपूर्वी तू आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य करण्यासाठी नेमल्यामुळे तुला हॉस्पीटलमध्ये घेऊन जाता आले नाही.यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे मला गेल्या १ वर्षापासून सतत त्रास देत आहे. माझा नाईलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा’

       

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून निखिल रणदिवे हे जीवाचे बरे वाईट करत आहे असे म्हणत मागील दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यांचा फोन बंद लागत आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून अद्यापही त्यांची दखल घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!