विद्यार्थी मधल्या सुट्टीत जेवणासाठी गेली, शिक्षकाने वर्गातचं केलं धक्कादायक कृत्य, घटनेने सगळेच हादरले…


जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत मुले जेवणासाठी वर्गाबाहेर गेली असताना एका शिक्षकाने भयंकर पाऊल उचलले. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी-शिक्षकच नव्हे तर संपूर्ण गावालाच मोठा धक्का बसला आहे.

सुपडू भादू पाटील विद्या मंदिर शाळेतील शिक्षक रवींद्र महाले यांनी मंगळवारी दुपारी शाळेच्या वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडली त्यावेळी शाळेमध्ये मधली सुट्टी सुरु होती. त्यावेळी विद्यार्थी प्रांगणात जेवणात व्यस्त होते. मात्र, मधली सुट्टी संपल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेने संपूर्ण शाळा, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पाचोरा शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रवींद्र महाले यांचा मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. शिक्षकाच्या वैयक्तिक आयुष्यातील कोणतेही ताणतणाव, मानसिक स्वास्थ्य, आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणी होत्या का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!