राष्ट्रवादीत हालचालींना वेग! ‘या’ महिन्यात नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होणार?


मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्ष संघटनेत कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांची नजर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

यामुळे राष्ट्रवादीत अनेक घडामोडी घडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. याचदरम्यान आता छगन भुजबळांनी ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. याबाबत दिल्लीत महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली.

स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची निवड होणार आहे. ॲागस्टपर्यंत पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अलिकडेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटील यांनी पाच वर्षांहून अधिक काळ सांभाळली आहे. यामुळे आता बदल होतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!