खरातला शक्तिवर्धक औषधांचा होता भयंकर नाद! अतिसेवन केल्याने अर्धांगवायूचा झटका, तरीही सुटेना नाद…

नाशिक : महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू खरातबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिस कोठडीत असलेल्य खरातचे एकेक हादरवणारे कारनामे समोर येत असून त्याने फक्त महिलांचं शोषण केलेलं नाही, तर अनेकांची आर्थिक फसवणूक करत लुबाडलं, गैरप्रकार करत कोटयवधींची संपत्तीही जमवल्याचं उघड झालं आहे.

एसआयटीकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत असून य़ाप्रकरणात वेगाने तपास सुरू आहे. आता दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आला होता. महिलांचे लैंगिक शोषण करणारा, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खरातची शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे बिघडली होती. त्याला अर्धांगवायूचा झटाक आला.
अनेक महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणारा या घाणेरड्या कृत्यांचं रेकॉर्डिंग करणारा भोंदू खरात सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. भोंदू खरात याच्या एका हाताची हालचाल आजही मर्यादित आहे. तसेच त्याच्या भुवईवरही परिणा झाल्याचे स्पष्टपणे दिसून येतंय. शक्तीवर्धक, उत्तेजक औषधं घेणं खरातच्या जीवावर बेतलं होतं. याप्रकरणी तपासातून अधिक महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

तसेच भोंदू बाबा अशोक खरातच्या बंदुकीचे लायसन्स अखेर रद्द करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने लायसन रद्द करण्याची ही कारवाई केली आहे. खरात याला 2012 साली लायसन्स देण्यात आलं, तर 2024 साली त्याचं पुन्हा नूतनीकरण करण्यात आलं. तसेच एक उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याची बायको यांनाही खरातने जाळ्यात ओढले होतं.
दरम्यान, शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडली, ज्यामुळे त्याच्या एका हाताची हालचाल मर्यादित झाली. लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असताना, हे धक्कादायक वैद्यकीय सत्य समोर आले आहे. याबाबत पुढील तपास अजून सुरु आहे.