देश हादरला ! श्रध्दा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती ; फ्रीज मध्ये तुकडे केलेल्या मृतदेहाचा वास आल्याने खून प्रकरणाचा उलगडा …

बंगळुरू: श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशभर खळबळ उडाली होती. लिव इन पार्टनर आफताब पूनावालाने तिची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिला होते. बंगळुरुमध्ये श्रद्धा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून, युवतीच्या (वय २९, रा. बिहार) मृतदेहाचे ३० तुकडे फ्रीजमध्ये आढळून आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
बंगळुरूच्या मल्लेश्वरम येथील एका इमारतीत श्आरके फ्लॅटमध्ये शनिवारी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. संबंधित फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर शेजारच्यानी तक्रार पोलिसांना माहिती दिली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. मूत युक्तीचे नाव महालक्ष्मी असून, ती पाच ते सहा महिन्यापूर्वी बंगळुरूला आली होती. महालक्ष्मीचा पती नेपाळचा असून तो एका आश्रमात काम करतो. दोघामध्ये वाद होत असल्याने ते वेगळे राहत होते. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘व्यालिकावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात महिलेचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला, हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. हत्या चार ते पाच दिवसांपूर्वी केली असावी श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास केला आत आहे. मृतदेहाची ओळख पटली आहे. महिला कर्नाटकात राहत होती, ती बिहारची होती. बंगळुरूत मल्लेश्वरम येथे एका कापड फैक्ट्रीत काम करत होती. पण गेल्या दोन आठवड्यापासून ती कामावर गेली नव्हती