न्यू अंबिका कला केंद्रातील आरोपीचा जामीन सत्र न्यायालयाने देखील फेटाळला, नेमकं कारण काय?


दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्रात २१ जुलै रोजी रात्रीच्या सव्वा अकरा वाजता गोळीबार झाल्याचे प्रकार समोर आला. हा गोळीबार भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर याने केल्याचे उघडकीस आले.

तसेच या प्रकरणांमध्ये गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि रघुनाथ आव्हाड हे त्याचे साथीदार होते. या चौघांचाही जामीन दौंडच्या कनिष्ठ न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता बारामतीच्या सत्र न्यायालयाने देखील चंद्रकांत मारणे याने वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला आहे.

हा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस एस सस्ते यांच्यासमोर या जामीन अर्जाची सुनावणी झाली. यामध्ये चंद्रकांत मारणे याने वैद्यकीय कारणास्तव जामीन अर्ज मांडला होता.

मात्र घडलेली घटना सार्वजनिक ठिकाणी अत्यंत धोकादायक स्वरूपाची आहे. जामीन अर्ज मांडणारा आरोपी प्रभावशाली व्यक्ती आहे व अद्यापही पूर्ण तपास झाला नसल्याने केवळ वैद्यकीय कारणास्तव हा जामीन अर्ज मंजूर करता येणार नाही अशा स्वरूपाची महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली आणि जामीन अर्ज फेटाळला.

चंद्रकांत मारणे याचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने उर्वरित तिघांच्या सुटकेचा मार्ग धूसर बनल्याचे बोलले जात आहे. चंद्रकांत मारणे याला अटक केल्यानंतर वैद्यकीय दृष्टीने त्याला जामीन मिळावा अशी मागणी मागणी याच्या वकिलांनी दौंडच्या न्यायालयात केली होती.

दरम्यान, मारणे याला जामीन मिळालाच, तर इतरांच्या ही जामिनाचा मार्ग मोकळा होईल अशी त्या मागची कल्पना असावी, मात्र दौंडच्या न्यायालयानेही हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता बारामतीच्या सत्र न्यायालयाने देखील जामीन अर्ज फेटाळला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!