छाननी थांबली! लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार’ या ‘तारखेला जुलैचा हप्ता

पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा ठरला.विधानसभा निवडणुकीमुळे त्यावेळी सरकारला अर्जांची काटेकोर पडताळणी करता आली नाही. मात्र त्यानंतर सरकारने वेगवेगळ्या अटी आणि कारणामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांना बाद केले. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली.मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने अर्जांचीं पडताळणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील अर्जांच्या छाननीमुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींमध्ये सध्या सरकार विरोधात प्रचंड असंतोषाची भावना आहे. या नाराजीचा फटका आगामी स्थानिक निवडणुकीत बसू शकतो आणि हा मुद्दा विरोधकांसाठी चर्चेचा विषय बनू शकतो या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होईपर्यंत सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याच स्पष्ट केले जात आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत लाडकी बहिण योजनेसाठी नो चाळण, नो गाळण असे धोरण स्वीकारलेले आहे. म्हणजे जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत तरी या योजनेतील महिलांची आता पडताळणी होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. दरम्यान जुलै चा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागला असताना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 5 ऑगस्ट 2025 च्या आत जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल अशी माहिती समोर आली आहे
