खरात प्रकरणाची व्याप्ती वाढली! 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची विकेट पडणार? कोण आहेत डीसीपी आणि एसीपी महिला अधिकारी?


पुणे: महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे कनेक्शन उघड झाल्यानंतर आता दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.ज्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,खरातच्या संपर्कात असलेल्या या महिला अधिकाऱ्यांपैकी एक डीसीपी तर दुसरी एसीपीदर्जाची अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन महिला पोलीस अधिकारी कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकाऱ्यांचे नाव खरातसोबत जोडले गेल्याने तपास यंत्रणांनी नव्या मार्गाने तपास सुरू केला आहे.

दरम्यान वरिष्ठ अधिकारी महिलांनी आपली आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का? असा सवाल देखील विचारला जात आहे. अशोक खरात प्रकरणात भोंदू बाबासोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का? याबाबत तपास होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागात देखील खळबळ उडाली आहे.

दरम्यान खरात प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे.पोलिसांनी काही दिवसांपूर्वी घराच्या नाशिक मधील तृप्तबाला बंगल्याची झडती घेतली होती. या धर्तीवर पोलिसांना असंख्य आधार कार्ड,पॅन कार्ड मिळाले होते.याचा वापर करून खरातने बनावट बँक खाते उघडणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!