बाईक अडवली म्हणून घडलं कांड!! थेट वाहतूक पोलीसाच्या डोक्यातच दगड घातला, पुण्यातील धक्कादायक प्रकार…
![](https://thetime2time.com/wp-content/uploads/2025/02/pune-1.jpg)
पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
वाहतूक पोलिसांवर एकाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्यामध्ये वाहतूक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात घडला. एक व्यक्ती फोनवर बोलत बाईक चालवत होता. तेव्हा तेथील वाहतूक पोलीस हवालदाराने बाईकस्वाराला अडवले. या गोष्टीचा राग बाईकस्वाराला आला आणि त्याने हवालदारावर प्राणघातक हल्ला केला.
हल्ला करुन बाईकस्वार पळून गेला.जखमी वाहतूक पोलीस हवालदाराचे नाव राजेश गणपत नाईक असे आहे. राजेश यांनी बाईक चालवत असताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले. यावर संतापलेल्या बाईकस्वाराने राजेश यांच्याशी वाद घातला.
रागात त्याने बाईकस्वाराने राजेश यांच्यावर हल्ला केला. त्याने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात जोरात घातला. हल्ला झाल्यानंतर पोलीस हवालदार राजेश नाईक गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान हल्ला करणारा आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात पोलीसच सुरक्षित नसल्याचे लोक म्हणत आहेत.