संपूर्ण जगात झाली साखरेची टंचाई! सारखेच दर वाढणार की कमी होणार.? निर्यातीवर बंधने येणार..

नवी दिल्ली : देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन त्यांना वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गहू आणि तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर बंधने घातली आहेत.
अशातच आता साखरेच्या निर्यातीवरही बंधने घातली जाणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन घेतले जाते. अशातच संपूर्ण जगात साखरेची टंचाई निर्माण झाली आहे.
भारत दुसऱ्या देशांना साखर निर्यात करतो. परंतु, यावर्षी अनियंत्रित पावसाचा फटका साखरेच्या उत्पादला होईल. जर असे झाले तर देशातून साखर निर्यात केली जाणार नाही, अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त केली जाणार आहे.
दरम्यान, २०२३-२४ मध्ये साखरेचे उत्पादन ३.४ टक्के घटून ३१.७ दशलक्ष टनांवर घसरू शकते. उत्पादनाचा विचार करता देशाकडून साखरेची निर्यात केली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आता येत्या काळात साखरेचे दर वाढणार की कमी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.