उरुळी कांचन नजीक शिंदवणे गावात बिबट्याचे वास्तव ! आठ दिवस बिबट्याने तळ ठोकून असल्याने बिबट्याने गावकऱ्यांची घबराट …!!

उरूळीकांचन :उरुळी कांचन नजीक शिंदवणे गावात बिबट्याचे वास्तव्य आढळल्याने गावकऱ्यांत मोठी घबराट पसरली आहे. गेली आठ दिवस हा बिबट्या ऊसाच्या फडात तळ ठोकून बसल्याने गावकऱ्यांची चांगलीच पाचवर धारण बसली आहे.या महाशयांनी अन्नाच्या शोधात काही मेंढ्या फस्त केल्याने या प्राण्याची धास्ती वाढली असून लोकवस्ती शेजारी व राणावणात बसलेल्या लोकवस्तीने बिबट्याची मोठी भिती घेतली आहे.
पूर्व हवेलीत उरुळी कांचन नजीक असलेल्या शिंदवणे गावात
मागणी काही दिवसांपासून बिबट्या वावरत असल्याचा चर्चांना मोठा ऊत आला होता. पण काही गावकऱ्यांच्या नजरेला हा प्राणी आढळल्याने बिबट्या आहे की नाही ?म्हणून उलट सुलट चर्चा सुरू होत्या. मात्र बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन गावकऱ्यांना होऊ लागल्याने बिबट्याचे वास्तव आता भितीदायक ठरु लागले आहे.काल रात्री बुधवार( ता.२०) रोजी बिबट्या हा ऊसाच्या शिवारात आढळल्याने अंगापिंडाने बलदंड असलेल्या बिबट्याने गावकऱ्यांना चिंतेत टाकले आहे.
शिंदवणे परिसरात ऊसाचे मोठे क्षेत्र असल्याने बिबट्या हा मागील आठ दिवसांपासून गावात भटकत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका शेतकऱ्याने पाळलेल्या मेंढ्या फस्त केल्याचे निदर्शनास आले आहे. शिंदवणे गाव हेवाडीवस्त्यांवर पसरल्याने शेतकरी व ग्रामस्थांना बिबट्याचा धोका संभवण्याची शक्यता आहे. तसेच हा परिसर उरुळीकांचन शहराजवळच असल्याने मोठ्या लोकवस्तीत बिबट्या शिरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडुन होत आहे.