सतीश वाघ हत्या प्रकरणी अखेर खरी कहाणी आली समोर! नवरा गेला, पोलिसांसमोर आक्रोश, जवळच्या व्यक्तीने सगळंच सांगितलं…

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती. पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सतीश वाघ हे दारू पिऊन मोहिनी वाघ यांना सतत त्रास देत होते तसेच प्रेमसंबंधात आड येत होते, त्यामुळे मोहिनी यांनी ५ लाखांच्या हत्येची सुपारी हल्लेखारांना दिली, अशी धक्कादायक माहिती बुधवारी रात्री उशिरा पोलिसांच्या तपासात समोर आली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, घटनेनंतर ज्यावेळी पोलीस मोहिनी वाघ यांच्या घरी चौकशीसाठी गेले, त्यावेळी पतीच्या जाण्याने आपल्याला अतीव दु:ख झाल्याचे नाटक करून पतीसोबत किती छान जमायचे, त्याचे काही प्रसंग मोहिनी यांनी कथन केले.
यादरम्यान दर काही मिनिटांनी ती मोठ्याने रडायची. आपल्या रडण्याने आणि आक्रोशाने पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही, असे मोहिनीला वाटले. मात्र मोहिनीच्या जवळच्या व्यक्तीनींच पोलिसांना अक्षय जवाळकर याच्याशी तिचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला. तेव्हा मुख्य आरोपी अक्षय जावळकर फरार होता. अक्षयचे फरारी असणे, हे संकेत त्याचा हत्येतील सहभाग पक्का असल्याचे पोलिसांना वाटले. त्यानुसार पुढील काही दिवसांत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यावर प्रकरणाचा छडा लागला.
दरम्यान, पोलिसांच्या सखोल चौकशीत अक्षय जावळकरने मोहिनी हिच्यासोबतच्या अनैतिक संबंधाची माहिती दिली. दोघांनी मिळून हत्येचा कट रचल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी नाताळादिवशी २५ डिसेंबरला मोहिनी वाघ हिला अटक केली.