फलटणमध्ये डॉक्टर महिलेला छळणारा PSI बदाने निघाला नीच विकृतीचा, महिलांसोबत घाणेरडं कृत्य, सगळी कुंडली झाली उघड…


सातारा : सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. तिने आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला आहे.

आपल्या मृत्यूस पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर नावाची व्यक्ती असल्याचा उल्लेख त्यांनी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये केला आहे. पीएसआय बदाने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं तिने हातावर लिहिलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे.

हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर दोघंही फरार झाले. आज पहाटे सातारा ग्रामीण पोलिसांनी बनकरला पुण्यातील फार्महाऊसवर अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

       

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदाने याचे अनेक कांड समोर येत आहेत. त्याने केवळ महिला डॉक्टरच नव्हे तर इतर महिलांना देखील त्रास दिल्याचं समोर आलं आहे. तो अनेकदा महिलांचा छेड काढायचा, त्यांना डोळा मारायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून बदाने याच्याविषयी अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत. काही महिलांनी थेट माध्यमांसमोर येऊन सांगितले की, बदने हा महिलांची छेड काढायचा, डोळा मारायचा आणि तक्रार केली तर उलट पैसे मागायचा. एका महिलेनं आरोप केला की तिच्या भाचीने तक्रार द्यायला गेल्यावर बदनेने तिच्याच नवऱ्यासमोर तिला डोळा मारला आणि पाच हजार रुपये मागितले.

दरम्यान, पैसे दिले नाहीत म्हणून त्याने तक्रारीचं दार बंद केलं. या महिला साक्षींमुळे प्रकरण आणखी गंभीर वळण घेत आहे. बदानेचा महिलांशी असलेला वर्तनाचा हा इतिहास आता उघडकीस येत असून, पोलिस विभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!