रक्षकच निघाला भक्षक! पुण्यातील सराफाला फसवणाऱ्या’ त्या’ पोलिसावर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात एका सराफ व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उधारीवर घेतलेल्या 8 लाख २२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचे पैसे न देता सराफाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस हवालदार व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिक सोनीग्रा यांचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. ते भवानी पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. जगताप पोलिस दलात असल्याने सराफा व्यवसायिकासोबत त्यांची ओळख होती. या ओळखीचाच गैरफायदा घेऊन त्याने पेढीतून आठ लाख 22 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. दागिन्याचे पैसे नंतर देतो म्हणून त्यांने उधारीवर दागिने खरेदी केल्याची फिर्याद सराफाने केली. त्यानंतर या प्रकरणीहवालदार गणेश अशोक जगताप आणि त्याची पत्नी अश्विनी (दोघे रा. कावेरीनगर पोलिस वसाहत, वाकड) यांच्याविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जगतापने यापूर्वीही भवानी पेठेतील एका सराफाची दागिने घेऊन फसवणूक केली होती. संबंधित सराफाने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर जगतापला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडून आला.