हवेलीत ‘दादा चा वादा ‘ पूर्ण! विधानसभेच्या निवडणूकीत दिलेला शब्द केला खरा! ‘यशवंत’ चा वनवास १४ वर्षानंतर येणार संपुष्टात…


जयदिप जाधव                                            उरुळीकांचन :गेली १४ वर्ष राजकीय इच्छाशक्तीचा बळी ठरलेल्या व २०२४च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या शब्दाने कारखान्याच्या पुर्नर्जिवीताचा शब्द मिळालेल्याहवेलीकरांना खऱ्या अर्थाने कारखाना सुरू होण्याचा सुर्योदय पहाण्याचा योग जुळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आपला दिलेला वादा पूर्ण करुन कारखान्याच्या भागभांडवल उभारणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता दिल्याने कारखाना सुरू होण्याच्या प्रयत्नाला तीन हत्तींचे बळ मिळाल्याने पुणे बाजार समितीच्या मदतीने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हवेलीकरांना गेली १४ वर्षे झुलवत ठेऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झालेल्या हवेली तालुक्याला प्रथमच एका राजकीय शक्तिचा भक्कम आधार मिळाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली १४ वर्षात नेहमीच मिळणाऱ्या अश्वासनाप्रमाणे हवेलीकरांना कारखाना सुरू होण्याचे आश्वासन अजित पवार यांनी विधानसभेत दिले होते. यंदाचे मात्र अश्वासन तालुक्याचा भूमिपुत्रांनी तालुक्यातूनचकारखान्याचा प्रश्न सोडावा म्हणून पुणे बाजार समितीच्या ठेवीतून करावे म्हणून केले होते. हिच कल्पना अजित पवार यांनी मान्य करुन कारखान्याची जमीन बाजार समितीला उपयोगी पडेल म्हणून खरेदी प्रस्तावाला संमती दिली होती.

आता तोच प्रस्ताव कायदेशीर चौकटीत टिकावा म्हणून मंत्रिमंडळ मान्यतेने संरक्षण दिले आहे. त्यामुळे विक्रीतून होणाऱ्या किमतीतून भागभांडवल उभे होणार आहे. गेली १४ वर्षे हवेलीकरांनी या कारखान्यासाठी लढा उभा केलेला जिल्ह्याने पाहिला आहे. कारखान्याची मालमत्ता ही कवडीमोल किमतीत बँकांनी लिलावात काढून विक्री केल्याचे सत्य सभासदांनी पचविले आहे.उर्वरीत मालमत्ताही राज्य सहकारी बँकेच्या जप्तीतून वाचविण्यासाठी कारखान्याचा कामगारांनी जप्ती उधळून लावून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला होता.तसेच काही सभासदांनी कारखान्याला अर्थिक मदत होत नाहीम्हणून पदरमोड करुन निधी उभारण्याचा प्रयत्न तसेच संचालक मंडळ निवडणूक होण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन संचालक मंडळ अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न गेली १४ वर्षात झाला होता. काही सभासदांनी सत्ताधाऱ्यांना झुगारुन ‘यशवंत’ बचावची मोहिम तेवत ठेवल्याने कारखाना सुरू होण्याचा कृतीला बळ मिळाले आहे.

त्यामुळे राज्य सरकारच्या मान्यतेने होणाऱ्या व्यवहाराला समितीची नेमणूक करुन पूर्ण करण्याची सबब अजित पवार यांनी पूर्ण करावी अशी मागणी होत आहे. कारखाना सुरू करण्याचा अर्थिक लेखाजोखा सभासदांपुढे मांडून संचालक मंडळाने आपली कृती करणे अपेक्षित असल्याचे सभासदांतून चर्चा सुरू आहे. ‘देर आये पर दुरुस्त आये’या युक्तीप्रमाणे कारखानाप्रश्न सोडविण्याची भूमिका घेतलेल्या अजित पवार यांच्या निर्णयाने हवेलीत स्वागत
होऊ लागले आहे.

बारामती, इंदापूर घडते हवेलीत का नाही?

बारामतीत राजकीय विरोध झुगारून एकमेकांविरुद्ध लढलेले पवार कुटूंब पुन्हा लोकसभा व विधानसभेत एकमेकांच्या विरोधात लढणार नाही म्हणून एकी दाखविते. तसाच प्रयत्न छत्रपती कारखान्यात होऊन तिथे सत्ताधारी विरोधक एकत्र येतात. मग हवेलीत राजकीय विरोध विसरून एकत्र येणार काय म्हणून तालुक्याचे लक्ष पुढील घडामोडींवर असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!