तळेगाव- चाकण, पुणे- शिरूर व हडपसर- उरुळी कांचन या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू, खासदार कोल्हे यांनी घेतला आढावा..


पुणे : “एमएसआयडीसी”च्या माध्यमातून तळेगाव – चाकण, पुणे – शिरूर व हडपसर – उरुळी कांचन या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत एमएसआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत खासदार अमोल कोल्हे यांनी बैठक घेऊन या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यामुळे लवकरच हे काम मार्गी लागणार आहे.

यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्याच्या दळणवळणाला, अर्थकारणाला गती देणारे हे प्रकल्प मंजूर करण्यासाठी मायबाप जनतेच्या पाठिंब्याने मी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. आपल्या या प्रामाणिक प्रयत्नांना अखेर यश आले आणि या प्रकल्पांना मंजुरी मिळाली.

असे असताना मात्र, माझे प्रयत्न इथेच थांबणार नाहीत. जोपर्यंत तळेगाव – चाकण, पुणे – शिरूर व हडपसर – उरुळी कांचन हे एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माझा हा पाठपुरावा निरंतर सुरू राहणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनाच्या पुणे विभागीय अधिकाऱ्यांसोबत मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करून मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला.

या बैठकीत पुणे – नाशिक सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. हा रेल्वे प्रकल्प पूर्वीच्या सर्वेक्षणानुसार पुणे – चाकण – संगमनेर – सिन्नर असा सरळमार्गेच उभारण्यासाठी जीएमआरटी च्या आक्षेपांच्या अनुषंगाने विविध पर्यायांवर चर्चा केली. ही कामे आपला मोठ्या प्रमाणावर विकास करणार आहेत.

पुणे ते उरुळीकांचन यादरम्यान रेल्वे प्रवाशांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे अशा सूचना यावेळी दिल्या. तसेच, हडपसर टर्मिनल येथील सुविधा, कोरेगाव मूळ व ससाणे नगर येथील अंडरपास याबाबतही चर्चा केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!