सोन्याचे दर गगनाला भिडले! ऐन लग्नसराईत सोनं 61 हजारांवर….!

मुंबई : सोने कितीही महाग असले तरी लोक ती प्रतिष्ठा जपण्यासाठी सोने खरेदी करतच असतात. आणि सध्या लग्नसराई मध्ये सोन्याचा भाव 61 हजारवर गेलेला दिसून येत आहे. परंतु तरी देखील सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसुन येत आहे.
बुधवारी म्हणजेच 5 तारखेला 10 gm सोन्याची किंमत 61 हजारावरती जाऊन पोहोचले व चांदी 74 हजारावरती गेलेली दिसून येत आहे. 6 एप्रिला सोन्याचा दर 60 हजार 850 प्रती तोळा आहे तर चांदीचा दर 76 हजार 200 आहे. सोन्याच्या किमती हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना जोरदार फटका बसलेला आहे.
गेल्या महिन्यापासून सोने हे दिवसेंदिवस वाढतचं आहे परंतु ग्राहकांचा ग्राहकांचा प्रतिसाद देखील तितकाच आहे. सोन्यांच्या किंमतीत वाढ होत असली तरी गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करावी, असं पी.एन.जी ज्वेलर्सच्या सौरभ गाडगीळ यांनी सांगितलं आहे. सोने जरी वस्तू असल्या प्रतिष्ठेच्या तरी देखील सोन्याची ही गुंतवणूक मर्यादितच करावी असे तज्ञ व्यक्तीने सांगितले आहे. वर्षअखेरीस सोन्याचा दर प्रतितोळा 70 हजारांवर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे.