सरकारमुळे सोनं फेब्रुवारीपासून महाग होण्याची शक्यता, नेमकं कारण काय? सविस्तर जाणून घ्या…


नवी दिल्ली : नववर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दरात घट किंवा वाढ सुरुच आहे. नववर्षातील पहिलाच महिन्यात सोन्याच्या दरात बरेच चढ-उतार पाहायला मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यात अर्थसंकल्प जाहिर होणार आहे.

आता अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या किमतीवरील कराबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये सरकार सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवू शकते. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ते ४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये सरकार सोन्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.

सरकार सोन्यावरील आयात शुल्क म्हणे कस्टम ड्युटी वाढवण्याच्या तयारीत आहे. जर १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा झाली तर सोन्याची आयात महाग होईल. त्यामुळे सोन्याचा भाव देखील आणखी वाढू शकतो.

दरम्यान, मागच्या वर्षी म्हणजे जुलै २०२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्के केले होते. आयात शुल्कातील ९ टक्के कपात ही आयात शुल्कातील आतापर्यंतची सर्वात मोठी कपात होती. तर २०१३ नंतर पहिल्यांदाच आयात शुल्क १० टक्क्यांच्या खाली आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!