योगींचा उत्तर प्रदेशात करिश्मा! माफियाच्या तावडीतून सोडवलेल्या जमिनीवर गरीबांना मिळणार घरे

लखनौ : माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून लुकरगंज येथील मोकळ्या झालेल्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेची लॉटरी ६ जून रोजी काढण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून, लॉटरी काढण्याबाबतची जाहिरातही शनिवारी (ता.३) म्हणजेच उद्या दिली जाणार आहे.

घरांचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. ती भगव्या रंगात रंगवण्यात आली आहेत. लुकरगंज येथील माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून मोकळ्या झालेल्या जमिनीवर प्रयागराज विकास प्राधिकरण द्वारे बांधण्यात येत असलेल्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेतील सदनिका भगव्या रंगात दिसणार आहेत.


दरम्यान, माफिया अतिक अहमद याच्या तावडीतून लुकरगंजमधील मोकळ्या केलेल्या जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या ७६ फ्लॅटसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत होती. अर्जानंतर एका फ्लॅटवर ८० दावे पुढे आले आहेत. अशा स्थितीत स्वत:च्या घराचे स्वप्न कोणाचे पूर्ण होणार, हे पीडीएची लॉटरी काढल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
