पोलिसांना फोन आला हॅलो इथं बलात्कार झालाय, पोलीस तातडीने गेले अन्….! पुण्यात धक्कादायक घटना


पुणे : पुण्यातील स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करत इथे बलात्काराची घटना घडल्याचा कॉल केला आणि मोठी खळबळ उडाली.

तातडीने स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली. मात्र, एका मद्यपीने दारूच्या नशेत पोलिसांना फोन करून खोटी माहिती दिल्याने उघड झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती विरोधात त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रीनिवास नारायण अकोले (वय ४२. रा. रामनगर, वारजे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

       

हेल्पलाइनवर बलात्काराचा कॉल आल्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित्त काईगडे, निरीक्षक नीलेश बडाख (गुन्हे) यांच्या अन्य अधिकारी व अंमलदारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर त्यांनी तक्रारदार श्रीनिवास अकोले यांना मोबाइलवरून संपर्क साधला.

अकोले यांनी आपणच पोलिसांना कॉल केल्याचे कबूल केले आणि ते घटनास्थळीच असल्याचे सांगितले. मात्र, अकोले पोलिसांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता, तो अडखळत बोलत असल्याने घटनेबाबत ठोस माहिती देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडे व परिसरातील इतर लोकांकडे चौकशी केली. चौकशीत परिसरात कोणतीही अशी घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!