पीकअप उलट्या दिशेने धावला , ड्रायव्हरने उतारावर काय केले पहा ….

पुणे : हडपसरमधील पिकअपचा अत्यंत भयानक जिवघेणा रिव्हर्स बघायला मिळाला होता. या थरारक व्हिडिओमागील आता कारण समोर आले असून पिकअप वाहन चालकावर हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण वाघमारे असे गुन्हा दाखल झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. रामटेकडी उड्डाणपुलावर ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी ही थरारक घटना घडली होती.
याप्रकरणी पोलीस शिपाई उमेश मचिद्र शेलार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत रामटेकडी उड्डाणपुलावर डिव्हायरचे काम चालू होते.
या कामाच्या ठिकाणी वापरात येणारा पिकअपचा चालक श्रावण वाघमारे याने रामटेकडी उड्डाणपुलावर वाहन पार्ककरताना हॅन्डब्रेक न लावता उतारावर तसाच उभा करून तो पिकअपमधून उतरला.
त्यामुळे पिकअप व्हॅन उतारावर वेगाने रिव्हर्स जाऊ लागली. रात्रीची वेळ असल्यामुळे पुलावर वाहतूक नसल्याने रोडवर सुदैवाने वाहनांची गर्दी नव्हती. पिकअप तब्बल ५०० मीटर उलट्या दिशेने गेल्यानंतर तो डिव्हायडरला धडकून थांबल्याने पुढील अनर्थ टळला.