स्वयंपूर्ण गावखेडी विकसित करण्याचा ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’अभियानाचे उदिष्ठ; सोरतापवाडीतून पुणे जिल्ह्यातील अभियानाचा शुभारंभ ; विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ…


जयदिप जाधव

उरुळीकांचन : स्वच्छ , सुंदर, सुदृढ व विकसक देश घडविण्याचा संकल्प प्रत्येक नागरीकाचा आहे. देशाला १९४७ पर्यंत शताब्दी स्वातंत्र्योत्तर वर्षातील वाटचालीत शाश्वत विकास ,स्वच्छता व आरोग्य संपन्न देश घडवून देशातील नागरीकांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून’तोच संकल्प अपेक्षित असून ग्रामस्थ, प्रशासन, लोकप्रतिनिधींनी सर्वांनी एकत्र येऊन लोकसहभागातून स्वयंपूर्ण गाव घडविण्यासाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या अभियानाचा पुणे जिल्ह्यातील शुभारंभ सोरतापवाडी (ता. हवेली) येथून पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलते होते. राज्य शासनाकडून राबविण्यात आलेले राज्यपातळीवर अभियान हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या कार्यक्रमाशी जोडण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे विभागीय अप्पर आयुक्त दिपाली देशपांडे,सहाय्यक आयुक्त रविंद्र कणसे, जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, हवेलीचे गट विकास अधिकारी शेखर शेलार,सरपंच मनिषा चौधरी, उपसरपंच विलास चौधरी, ज्येष्ठ नेतेरामदास चौधरी, बाळासाहेब चोरघे, बाळासाहेब चौधरी, शशिकांत चौधरी, सुदर्शन चौधरी, ग्रा.प. सदस्य सनी चौधरी , तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल चौधरी ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्राम राज्य शासनाने या अभियानाची रुपरेषा तयार केली आहे. त्यानुसार पुढील १०० दिवसांत प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार होणार आहे. या आराखड्याला राज्यस्तरीय, जिल्हा तसेच तालुकास्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच बक्षीस योजना जाहीर केली आहे. त्यानुसार स्वच्छता, शास्वत विकास ,महिला व बालक विकास या मुद्दांवर मूल्यमापन होऊन बक्षीस वितरण होणार असल्याचे त्यांनीसांगून आराखड्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी होऊन समृद्ध गाव विकसित करण्याचा संकल्प करावा असे त्यांनी आवाहन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभिमानानूसार सेवा पंधरावडा व निरोगी महिला सशक्त कुटूंब व राष्ट्रीय पोषन मास आहार या योजना सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील , उपसरपंच विलास चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कड यांनी केले तर आभार रामदास चौधरी यांनी मानले आहेत. दरम्यान सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने या अभियानाचा शुभारंभाचा बहुमान प्राप्त झाल्यानंतर डोल लेझीम काढून प्रभात फेरी काढण्यात आलीतर , रांगोळीतून अभियानाचा संकल्प मांडण्यात आला.

आयुक्तांनी स्वच्छतेबाबत दिले संत तुकोडाबांचे दाखले !

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्यक्रमात स्वच्छता, श्रमदान व आरोग्याबाबत राष्ट्रसंत तुकडोबांच्या अभंगाचे दाखलेदेऊ केले. त्यांनी स्वच्छतेबाबत ‘चहू दिशांनी सुंदर गाव”वारे जीवन संचारते’ ‘कोठेही घाण न दिसे’ ‘न पाहताना गळे दिसावे’तर श्रमदानाबाबत ‘श्रमदानाचे सप्ते भरवावे सर्वांनी रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी ‘ ‘शोषण खड्डे घेऊन सांडपाणी थांबवावे सर्वांनी’ असे अभंगाचे दाखले देऊन स्वच्छता व आरोग्यबाबत तुकोडांची ग्रंथगिता अनुकरावी असे आवाहन त्यांनी केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!