महापालिकेचे बिगुल वाजले! 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या…


मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून त्यामुळे राज्यभरात महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे.

तसेच मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडसह प्रमुख शहरांमध्ये इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली असून युती आणि जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे.अनेक ठिकाणी प्रमुख पक्षांमध्ये आघाडी अथवा युतीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने पहिल्याच दिवशी किती उमेदवार अर्ज दाखल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्याने बंडखोरीची शक्यता देखील वर्तवली जात आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. इच्छुक उमेदवारांना 30 डिसेंबरपर्यंत संबंधित झोन कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. शहरातील 38 प्रभाग 10 झोनमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक झोनसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्यानिवडणुकीसाठीही आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. जागावाटप आणि उमेदवार निश्चितीवर पक्षांतर्गत चर्चा सुरू असतानाच निवडणूक प्रक्रियेचा अधिकृत प्रारंभ झाला आहे. पुणे महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

       

मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा निर्णय असल्याचे संकेत मिळत आहेत. पुणे महापालिकेसाठी भाजपकडून प्रभागनिहाय उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात असून शुक्रवारी पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही यादी किमान 80 उमेदवारांची असेल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर सध्या सावध भूमिका घेतली जात आहे. जागावाटपात योग्य न्याय मिळाल्यास सहभागी व्हावे, अन्यथा महाविकास आघा

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!