देशावर मोठं संकट! पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात थंडीची लाट येणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट…

पुणे : राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असून, उत्तर महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यात देखील थंडीची लाट कायम आहे. 17 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांना थंड लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तापमानात मोठी घट होत असल्यामुळे शीतलहरीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. . त्यामुळे हवामान विभागाने राज्यात येलो अलर्ट जारी करत पुढील काही दिवस सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः गारठा वाढल्याने आणि पावसाचे ढग कायम असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्यात तब्बल 10.6°c पर्यंत किमान तापमान घसरले असून गेल्या दोन दिवसांत तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. परिणामी पुणेकरांना थंडीचा जोरदार कडाका जाणवत असून सकाळच्या वेळी दाट धुके आणि दव दिसत आहे.

हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता दर्शवली असली तरी थंडीचा गारठा टिकून राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात मोठी घसरण झाली आहे.
निफाड आणि धुळे येथे पारा थेट 8°c च्या आसपास पोहोचला असून थंडीच्या लाटेची लक्षणं दिसू लागली आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे या भागात गारठा अधिक वाढत आहे. पहाटे दाट धुके आणि दव पडत असल्यामुळे शेती आणि आरोग्यावर त्याचा परिणाम जाणवत आहे.
मराठवाड्यातही तापमानात मोठी घसरण होत असून परभणी येथे 8.5°c तापमानाची नोंद झाली. गोंदिया, जेऊर, भंडारा येथेही तापमान 10°c पेक्षा कमी नोंदले गेले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने सावधगिरी म्हणून येलो अलर्ट जारी केला आहे.