काळजी घ्या! राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज…

मुंबई : गेले काही दिवस मुसळधार सरी कोसळत असताना, हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच मुंबई, कोकण किनारपट्टीसह राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

विशेषत: कोकण, मुंबई, ठाणे, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे. मुंबईत रविवारी दुपारी आणि आज सकाळपासूनही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळीपासून अंधेरी सबवे मध्ये २ ते ३ फूट पाणी साचले असून, वाहतूक बंद करण्यात आली आहे.
प्रशासनाने बॅरिकेट्स लावून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पाणी उपसण्यासाठी पंप आणि जीवरक्षक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत रविवारी दुपारी आणि आज सकाळपासूनही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

सकाळीपासून अंधेरी सबवे मध्ये २ ते ३ फूट पाणी साचले असून, वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने बॅरिकेट्स लावून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पाणी उपसण्यासाठी पंप आणि जीवरक्षक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.