सावधान! महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास धोक्याचे, ‘या’ ७ जिल्ह्यांना हायअलर्ट जारी…


पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच काही शहरांमधील प्रदूषण प्रचंड वाढले. हवा दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. मुंबईमधील वायू प्रदूषण प्रचंड वाढलंय. कधी उन्हाळा, कधी थंडी तर मध्येच अवकाळी पाऊस अशी स्थिती राज्यात आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वीच मोठा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले शेतकऱ्यांचे सर्व पिक वाहून गेले. केंद्र शासनाकडून झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात राज्यातून थंडी गायब झाली पण अजूनही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. वर्षभर राहिल्या सारखा यंदा पाऊस राहिल्याचे दिसत आहे.

पुन्हा एकदा अनिश्चित वळण घेतले असून तापमानातील मोठ्या चढउतारांदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील विविध भागांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून पुढील काही तासांत हवामानात झपाट्याने बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

खबरदारी घेण्याचे आवाहन…

नांदेड, लातूर , धाराशिव, हिंगोली, आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!