राज्यात सुरू झालेला नवीन साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार विक्रमी 3300 रुपये दर, जाणून घ्या….


इस्लामपूर : येथील एन. डी. शुगर्स या गूळ पावडर, खांडसरी आणि वीजनिर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या बॉयलरचे अग्निप्रदीपन बुधवारी झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने हा कारखाना सुरू झाला आहे. यावेळी मार्गदर्शक संचालक केदार पाटील यांनी येत्या १० दिवसांत पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी गाळपासाठी आलेल्या उसाला एकरकमी ३,३०० रुपयांचा दर देणार असल्याची केली. याबाबत केदार पाटील म्हणाले, अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांच्या अथक परिश्रमाने हा प्रकल्प साकारला आहे. दोन नद्यांची सुपीकता आणि ऊस पिकाची मुबलकता असूनही गेल्या ५० वर्षांत दुसरा कारखाना झाला नव्हता. यामुळे अडचण निर्माण होत होती. कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा प्रकल्प उभा करण्याचे आई-वडिलांचे स्वप्न होते.

ते साकारल्याचा आनंद आहे. आमची कोणाशीही स्पर्धा नाही. मानवी चुका टाळून कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी सर्व यंत्र सामग्री आधुनिक तंत्रज्ञानावर चालणार आहे. ६०० हून अधिक युवकांना प्रत्यक्ष तर इतरांना अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अजून जास्तीचे पैसे कसे देता येतील याकडे लक्ष देणार आहे.

तसेच ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबाइलवर सर्व माहिती दिली जाणार आहे. उसाचे वजन कोठूनही करून आणायची मुभा असणार आहे. संचालिका अंजली पाटील म्हणाल्या, कारखान्याच्या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगार देणार आहोत. महिलांसाठी इतर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

यावेळी संचालक मिलिंद पाटील, धनंजय पाटील, मुकुंद पाटील, सर्जेराव बोडरे, समीर तांबोळी, ज्ञानराज निंबाळकर, मीरा निंबाळकर उपस्थित होत्या. चांगला दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!