ठाकरेंचा मुंबईत ‘मास्टरप्लॅन’! ‘या’ उमेदवारांचे नाव ठरले, एबी फॉर्मही वाटप, आतापर्यंत कोणा-कोणाला उमेदवारी जाणून घ्या..

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मातोश्रीवर काल रात्रीपासून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झाली आहे. ज्या जागा शिवसेनेसाठी निश्चित झाल्या आहेत, त्या जागांवरती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री मातोश्रीवरून एबी फॉर्म दिले आहेत.
पक्षाने मुंबईतील तब्बल २८ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. रविवारी रात्रीपासून मातोश्रीवर टप्प्याटप्प्याने एबी फॉर्म वाटपाला सुरुवात करण्यात आली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः अनेक इच्छुक उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्या हातात एबी फॉर्म दिले. मात्र यावेळी उमेदवारी निश्चित झालेल्या नेत्यांनाच बोलावण्यात आले होते.

काही उमेदवारांना रविवारी रात्री एबी फॉर्म देण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांना सोमवारी म्हणजेच आज एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी अधिकृत जाहीर होण्याआधीच एबी फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित करण्याचा हा डाव असल्याचे मानले जात आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आणि पक्षातील अंतर्गत असंतोष रोखण्यासाठी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांची नावे जाहीर होऊ नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून, कोणाला फॉर्म देण्यात आला याची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी पक्षाकडून कठोर शिस्त पाळली जात आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली अधिकृत उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरेंच्या सेनेकडून देण्यात आले एबी फॉर्म..
प्रभाग क्र ३- रोशनी कोरे गायकवाड
प्रभाग क्र २९ – सचिन पाटील
प्रभाग क्र ४०- सुहास वाडकर
प्रभाग क्र ४९ – संगीता संजय सुतार
प्रभाग क्र ५४- अंकित प्रभू
प्रभाग क्र ५७ – रोहन शिंदे
प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे
प्रभाग क्र. ६० – मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. ६१ – सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. ६२ – झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. ६४ – सबा हारून खान
प्रभाग क्र ६५ – प्रसाद प्रभाकर आयरे
प्रभाग क्र– ८९- गितेश राऊत
प्रभाग क्र ९३ – रोहिणी कांबळे
प्रभाग क्र ९५ – एड हरी शास्त्री
प्रभाग क्र. १०० – साधना वरस्कर
प्रभाग क्र १०५ – अर्चना चौरे
प्रभाग क्र १११ दिपक सावंत
प्रभाग क्र११७- श्वेता पावसकर
प्रभाग क्र. १२४ – सकीना शेख
प्रभाग क्र. १२७ – स्वरूपा पाटील
प्रभाग क्र१३७- महादेव आंबेकर
प्रभाग क्र-१३८- अर्जुन शिंदे
प्रभाग क्र– १४१ – विठ्ठल लोकरे
प्रभाग क्र – १४२ – सुनंदा लोकरे
प्रभाग क्र १४८ प्रमोद शिंदे
प्रभाग १५०- सुप्रदा फातर्फेकर
प्रभाग क्र १५५ स्नेहल शिवकर
प्रभाग क्र. १५६ – संजना संतोष कासले
प्रभाग क्र. १६४ – साईनाथ साधू कटके
प्रभाग १६७ – सुवर्णा मोरे
प्रभाग क्र. १६८ – सुधीर खातू
प्रभाग क्र २०६- सचिन पडवळ
प्रभाग क्र २०८ रमाकांत रहाटे
प्रभाग क्र २१५- किरण बालसराफ
प्रभाग क्र २१८- गीता अहिरेकर
प्रभाग क्र २२२- संपत ठाकूर
प्रभाग क्र २२५- अजिंक्य धात्रक
साधना वरस्कर
वॉर्ड 100
संजना कासले
वॉर्ड 256
साईनाथ कटके
वॉर्ड 164 चांदीवली
एड सुधीर खातू
वॉर्ड 168 कुर्ला
सुवर्णा मोरे
वॉर्ड 167 कुर्ला कलिना
हरी शास्त्री ( जावई श्रीकांत सरमळकर)
वॉर्ड 95
अंकित सुनील प्रभू ( सुनील प्रभू यांचा मुलगा )
वॉर्ड – 54 ( गोरेगाव )
अक्षता टंडन
वॉर्ड 101 ( वांद्रे पश्चिम )
प्रज्ञा भूतकर ( तिकीट मिळाला नाही म्हणून नाराज महिला )
वॉर्ड 94
शिल्पा अजय भोसले
वॉर्ड 126
समीक्षा सक्रे
वॉर्ड – 135 ( माजी नगरसेविका ).
विठ्ठल गोविंद लोकरे
वॉर्ड क्रमांक 141
सुनंदा विठ्ठल लोकरे
वॉर्ड क्रमांक 142
समीक्षा दीपक सक्रे
वॉर्ड क्रमांक 135
अर्जुन आनंद शिंदे
वॉर्ड क्रमांक 138
महादेव आंबेकर
वॉर्ड क्रमांक 137
शमीन बानो खान
वॉर्ड क्रमांक 134
(मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा)
वॉर्ड 142 ( मानखुर्द)
तिकीट नाही मिळाला म्हणून नाराजी ,अश्रू अनावर
हर्षदा गजानन पाटील
वॉर्ड – 176 ( सायन कोळीवाडा )
वर्सोवा सहा वॉर्ड
प्रभाग क्र. ५९ यशोधर (शैलेश )फणसे
प्रभाग क्र. ६० मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. ६१ सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. ६२ झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. ६३ देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. ६४ सबा हारून खान
