पुणे महापालिकेतील 10 स्वीकृत नगरसेवकांची नावं निश्चित, कुणाकुणाला दिली संधी?


पुणे : नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील इच्छुकांची संख्या वाढली होती. अशातच आज,पुणे महापालिकेत आज 10 स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे 2 तर काँग्रेसचा 1 असे स्वीकृत नगरसेवक निवडण्यात आले.

पुणे महानगरपालिकेच्या या स्वीकृत नगरसेवक पदांमध्ये भाजपने निष्ठावांतांना संधी देत 7 जणांची निवड केली. काकडे, शेंडगे आणि पुरोहित यांना भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून दोन जणांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये अनुभवी म्हणून माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांची निवड करण्यात आली आहे. तर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी राकेश कामठे यालाही उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने एका जागेवर कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड केली आहे.

भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची नावे-

1.निलेश कोंढाळकर,2.प्रियंका शेंडगे,3. विश्वास नानावरे,4.राजेंद्र काकडे,5.रवी साळेगावकर,6.जयप्रकाश पुरोहित,7.उदय लेले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून स्वीकृत नगरसेवक-

1.दत्तात्रय धनकवडे,2.राकेश कामठे

काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक-

सुनील शिंदे

दरम्यान महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष या सर्व पदावर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांमध्ये ही भाजपला सात स्वीकृत नगरसेवक यामध्ये निवडण्याची संधी मिळाली. त्यासाठी जवळपास 300 जण इच्छुक असल्याचं सभागृह नेत्यांनी सांगितले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!