धक्कादायक! मुलीचं प्रेमप्रकरण समजलं, आईने मुलीची गळा दाबून केली हत्या; गुन्हा दाखल


मुंबई : प्रेमप्रकरणातून आईने थेट आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या वांद्रे परिसरातुन समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

आईने स्वतःच्या मुलीचा खून केला आहे. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी आईवर खूनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या प्रेमसंबंधांची जाणीव आईला लागली होती. यावरून मुलगी आणि आईमध्ये वाद सुरु झाला. या वादात मुलीने आईच्या हाताच्या बोटाचा चावा घेऊन तोडले. रागाच्या भरात आईने मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मुलीला फिट आल्याचं सांगून मृत्युचा बनाव रचला. अहवालात मुलीची गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आईवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!