पीएफधारकांसाठी सर्वात फायद्याची बातमी! ‘ही’ नवीन सेवा उपलब्ध, जाणून घ्या….

नवी दिल्ली : देशभरातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या आधारे PF संबंधित सेवा मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या नव्या योजनेनुसार केवळ चेहरा दाखवून UAN अॅक्टिव्ह करणे, पीएफ काढणे, बॅलन्स तपासणे यांसारख्या सेवा शक्य होणार आहेत. 1 ऑगस्ट 2025 पासून ही सेवा UMANG अॅपद्वारे उपलब्ध झाली असून, यामध्ये Aadhaar Face RD तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
या नव्या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना कंपन्यांची मदत न घेता, आपला पीएफ खाते सक्रिय करणे आणि वापरणे अधिक सुलभ झाले आहे. EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, UAN allotment आणि activation ही प्रक्रिया आता घरबसल्या होऊ शकते. UMANG अॅपमधून Aadhaar क्रमांक टाकून, OTP द्वारे व्हेरिफिकेशन केल्यानंतर चेहरा स्कॅन केला जातो.

एकदा फेस ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावर, तुमचा UAN नंबर जनरेट होतो आणि तो तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होतो.या तंत्रज्ञानामुळे EPFO च्या सेवा आणखी सुलभ व डिजिटल स्वरूपात मिळणार आहेत. विशेष म्हणजे आता कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही. सर्व प्रक्रिया तुमच्या स्मार्टफोनवरच होणार आहे.
कोणत्या सुविधा मिळणार? :
नवीन पद्धतीनुसार, UMANG अॅपमध्ये कर्मचाऱ्यांना तीन सेवा मिळतील: (EPFO New Rule)
UAN allotment
UAN activation
फेस ऑथेंटिकेशनद्वारे लॉगिन
या सुविधांमुळे EPF मधून रक्कम काढणे, बॅलेन्स तपासणे, माहिती अपडेट करणे आणि employment linked incentive (ELI) लाभ घेणे सहज शक्य होईल. जे सदस्य UAN शिवाय आहेत, त्यांनाही आता ही प्रक्रिया करता येईल.