मला गप्प करण्यासाठी लाच दिली गेली! विधानसभेत आमदाराने दाखवले नोटांचे बंड्डल…!

दिल्ली : दिल्लीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील रिठाला विधानसभेचे आमदार मोहिंदर गोयल यांनी आज विधानसभेत त्यांना लाचेसाठी टोकन म्हणून देण्यात आलेल्या नोटा दाखवल्या. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्यांनी लाचेच्या नोटा दाखवल्याने सभागृहातील उपस्थितांना धक्का बसला. रुग्णालयातील नोकरी भरतीत झालेल्या गैरप्रकाराबाबत विधानसभेत गोयल यांनी आज आवाज उठवला. यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले होते.
या नोकरी भरती कंत्राटात वरिष्ठ पातळील मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा मुद्या त्यांनी यावेळी उपस्थित केला. गोयल एका पिशवीत
चक्क १५ लाखांच्या नोटांचे बंडल घेऊन सभागृहात आले. पिशवीतील नोटा त्यांनी समोरील टेबलवर ठेवल्या होत्या.

यावेळी ते म्हणाले, या नोकरी भरतीत नियमानुसार 80 टक्के भरती जुन्या कर्मचाऱ्यांची करणे गरजेचे आहे. पण या नियमाकडे दुर्लक्ष करुन या नोकरी भरतीत मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात येत आहे, मला गप्प राहण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला, असे सांगत त्यांनी नोटा दाखवल्या आहेत.
माझ्यासोबतही काही अनुचित घडू शकते. आवाज उठवू नये म्हणून मला पैशांच्या स्वरूपात लाच देण्यात आली, असे गोयल म्हणाले. सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत आहे.