बजेट २०२५ मध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार, निर्मला सीतारामन करणार मोठी घोषणा…

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निर्मला सीतारामन या आठव्यांदा संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.

बजेट २०२५ बद्दल महत्त्वपूर्ण मुद्दे तज्ञ मांडत आहेत. मध्यमवर्गीयांना आयकरात दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकार मानक वजावटीची मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते. तसेच, आयकर स्लॅबमध्ये बदल करून करदात्यांना सवलत देण्याची शक्यता आहे. या उपायांमुळे मध्यमवर्गीयांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण थोड्याच वेळात त्यांचे आठवे बजेट सादर करतील. मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी आयकर स्लॅबमध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वित्तीय तूट कमी करण्यासोबतच आर्थिक वृद्धी दर गाठण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.

दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि मध्यमवर्गावर आई महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम असो, असे शुभ संकेत दिले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर, सरकारकडून मध्यमवर्गीयांना कर सवलती देण्याची अपेक्षा आहे. आता थोड्याच वेळात, या अपेक्षांची पूर्तता होते का, हे समजणार आहे.
