माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढली, संपूर्ण राज्याचे लागले लक्ष, कोण मारणार बाजी?


बारामती : बारामती येथील माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सध्या रंगत वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्ज दाखल केल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. माळेगांव सहकारी साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणूकीत स्वतःहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान होणार आहे. विरोधक रंजन तावरे यांनी संचालक मंडळाच्या कारभाराबाबत सांगवी येथील मेळाव्यात सडकून टीका केली. या कारखान्यावर सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्ता आहे. यामुळे ती टिकवण्यासाठी अजित पवार हे स्वतः हा मैदानात उतरले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या संचालक मंडळाचा गेल्या पाच वर्षांतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जेष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांनी सांगवी येथे मेळावा घेऊन सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. त्यांनी देखील मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता मिळवली होती.

त्यांनी सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून सध्या घोंगडी बैठकाही सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आता दोन्ही बाजूने वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे.

तसेच शरदचंद्र पवार पक्षानेही बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून तयारी सुरू केली आहे. कष्टकरी शेतकरी समितीने तर जाहीरनामा प्रसिद्ध करून सभासदांना भेटी सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत उतरली आहे.

एकूणच माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची यंदाची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार हे मात्र निश्चित आहे. शरद पवार व अजित पवार हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढले आहेत. त्यामुळे आता माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गट व अजित पवार गट एकत्र लढणार की वेगवेगळे याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!