लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी! लाभार्थी महिलांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली, आदिती तटकरेंची मोठी घोषणा..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

आता या योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या योजनेसाठी पात्र नसताना देखील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निर्दर्शनास आलं होतं, त्यानंतर सरकारने अशा महिलांची नाव या योजनेतून वगळण्यासाठी केवायसी बंधनकारक केली होती.
या केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ज्या महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत केवायसी केली नाही, त्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली आहेत.

योजनेसाठी पात्र असूनही केवायसी पूर्ण केलेल्या काही महिलांची नावे तांत्रिक त्रुटींमुळे यादीतून वगळण्यात आली होती. या चुका दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती आणि त्या कालावधीत आवश्यक दुरुस्त्या करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
दरम्यान, अनेक लाभार्थी महिलांनी केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली असून आता केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृत घोषणा केली आहे.