राखी बांधायला आलेल्या बहिणीची ठरली शेवटीची राखीपौर्णिमा, अपघातात जागीच मृत्यू, बोरीभडक येथील घटनेने हळहळ..


जीवन शेंडकर

यवत : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बोरीभडक फाट्यावर पुणे कडून येणाऱ्या चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण-भावाचा अपघात झाला. या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला तर, भाऊ जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी (ता.३०) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

वैशाली नितीन शेंडगे (वय २८, रा. नायगाव, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विलास विश्वनाथ कोपनर (रा. बोरीभडक, ता. दौंड) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.

मिळलेल्या माहिती नुसार, वैशाली शेंडगे व विलास कोपनर हे बहिण-भाऊ आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त वैशाली शेंडगे या बंधू विलास यांच्याबरोबर दुचाकीवरून बोरीभडक या ठिकाणी बुधवारी (ता.३०) निघाल्या होत्या. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोरीभडक फाट्यावर सोलपुरच्या बाजूकडे जाणाऱ्या चारचाकी गाडीने पाठीमागून विलास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

तसेच यावेळी वैशाली शेंडगे यांना जबरदस्त मार लागला. उपस्थित नागरिकांनी उपचारासाठी नेले असता उरूळीकांचन येथील सिद्धिविनायक हाॅस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच वैशाली यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर विलास यांना ही दुखापत झालेली आहे.

राखी बांधायला आलेल्या बहिणीवर काळाने घाला घातल्याने कोपनर परिवारासह बोरीभडक पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, यापरिसरात वारंवार अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे, फाट्यावर लावलेले विजेचे दिवे बंद पडलेले आहेत तर रस्त्यावर चार महिन्यापासुन पडलेला मोठा खड्डा जिवघेणा ठरत आहे तो लवकर बुजवावा. याठिकाणी अपघात होणार नाही,यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!