महायुतीच्या जागावाटपातली सर्वात मोठी बातमी, कुणाला किती जागा? जाणून घ्या

Loksabha Seat Sharing : अखेर महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. कोणाला किती जागा मिळाल्या आहेत? महायुतीमध्ये भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या ३० जागा दिल्या जाणार आहेत. ३०-१३-०४-०१ असा महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
दरम्यान, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारआणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला लोकसभेच्या ३० जागा मिळणार आहे. तर शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि मनसेला १ जागा मिळणार आहे.
आजही भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीत राज्यातील काही उमेदवारांच्या नावांचा समावेश असणार आहे.