बहिणीला जमीन बक्षीसपत्र करून दिली नंतर दुसऱ्यालाच विकली, मायलेक अडकले जाळ्यात, गुन्हा दाखल…


शिक्रापूर : जमीन आणि पैशासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. माय लेकरांनी अगोदरच बहिणीला दिलेल्या बक्षीसपत्र जमिनीची पुन्हा त्रयस्थ व्यक्तीला विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार शिक्रापूर येथून समोर आला आहे.

याप्रकरणी शिक्रापूर येथील माय लेकरांवर पोलिसांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांढरे व अंजना मांढरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रदीप रामचंद्र पवार यांनी शिक्रापूर पोलीसांकडे फिर्याद दाखल केली होती. तसेच यापैकी सदा मांढरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याची थोडक्यात हकीकत अशी, सप्टेंबर २०२० मध्ये सदा महादेव मांढरे व त्याची आई अंजना नामदेव मांढरे यांनी सदाची बहीण सुचिता सातकर हिला त्या दोघांच्या नावावर असलेली साडेआठ गुंठे जमीन बक्षीसपत्राने दिली.

त्यानंतर सदा व अंजना या दोघांनी चिंचवडगाव मधील प्रदीप रामचंद्र पवार यांना ऑक्टोबर २०२० मध्ये १६ लाख ४० हजार रुपये घेऊन सदरचे साडेआठ गुंठे क्षेत्र विकून त्याचे दस्त नोंदवले. ‌ दरम्यान जेव्हा पवार जमीन ताब्यात घेण्यासाठी गेले. तेव्हा सुचिता सातकर यांनी ही जमीन माझ्या नावावर असून तुमचा इथे संबंध नाही असे सांगितले.

त्यावरून प्रदीप पवार यांनी शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंध कार्यालयात जाऊन माहिती घेतली. दरम्यान, तेव्हा हेच क्षेत्र सुचिता सातकर यांना मांढरे या मायलेकरांनी सप्टेंबर २०२० मध्ये बक्षीसपत्र करून दिले होते असे निदर्शनास आले. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर प्रदीप पवार यांनी पोलिसात धाव घेतली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!