हाफ तिकीट हाय म्हणत महिलेचा बसमध्ये राडा ! फडणवीसांची घोषणा ठेवली लक्षात…!


लातूर : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी बसमध्ये महिलांना हाफ तिकीट करणार असल्याची घोषणा केली. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता शिंदे फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेचा एका एसटी वाहकाला चांगलाच फटका बसला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. याचे कारण म्हणजे महिलेला आता अर्ध तिकीट हाय म्हणत महिलेने एसटी वाहकाशी हुज्जत घातली. तर, तिच्या मुलाने वाहकाला थेट मारहाणच केली. यामुळे वातावरण तापले होते.

याप्रकरणी जखमी वाहकाच्या तक्रारीवरून महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता ही योजना लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे. अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासादरम्यान तिकीटाची ५० टक्के रक्कम द्यावी लागेल अशी घोषणा करण्यात आली होती.

त्याची जाहिरातबाजी देखील मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे लगेचच हा नियम लागू झाला असे अनेकांना वाटले. घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना जीआर मिळणे आवश्यक असते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!