पुण्यात खून सत्र सुरूच! दोघा अल्पवयीन मुलांनी युवकाला धारदार शस्त्रांनी संपविले..!!
पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
किरकोळ वादामुळे लहान भावाला मारल्याचा बदला म्हणून दोन अल्पवयीन मुलांनी युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना खडकी परिसरातून समोर आली आहे.
धीरज प्रदीप भोसले (वय.२२) राहणार चव्हाण वस्ती, आंबेडकर चौक बोपोडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.२) रोजी एक वाजण्याच्या सुमारास बोपोडीतील आंबेडकर चौकजवळील चव्हाण वस्ती या ठिकाणी दोघांकडून पूर्ववैमनस्यातून युवकाचा धारधार शस्त्राने युवकाचा खून करण्यात आला.
दरम्यान, खून केल्यानंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु खडकी पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.