क्रिकेटचा आनंद दुःखात; बॉलसाठी छतावर गेलेल्या मुलासोबत हृदयद्रावक घटना…


नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना एका चिमुकल्यासोबत भीषण अपघात घडला. खेळताना छतावर गेलेला चेंडू आणण्यासाठी तो वर गेला आणि त्याच वेळी त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.

क्षणातच आनंदाचे वातावरण भीतीत बदलले. विजेचा झटका बसताच मुलगा खाली कोसळला. त्याच्या कपड्यांना आग लागली होती आणि शरीरातून धूर निघत होता. तो वेदनेने तडफडत होता, नीट उभं राहणं किंवा चालणंही त्याला शक्य होत नव्हतं.

विजेचा धक्का लागल्यामुळे आजूबाजूचे लोक घाबरले आणि सुरुवातीला कुणीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत करत नव्हते, त्यामुळे काही काळ परिस्थिती अधिकच गंभीर बनली. घटनेच्या वेळी मुलगा छतावरच होता. परिसरातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले आणि आरडाओरड सुरू झाला. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहिती नुसार, अरमान खान हा मुलगा दुपारच्या वेळी आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यात मग्न होता. चौकार-षटकार मारत सगळी मुलं आनंदात रमली होती आणि वातावरणही उत्साहपूर्ण होतं. मात्र खेळता खेळता चेंडू जवळच असलेल्या एका दुकानाच्या लोखंडी पत्र्याच्या छतावर जाऊन पडला आणि तो आणण्यासाठी अरमान छतावर गेला… आणि पुढे ही भीषण घटना घडली.

चेंडू परत आणण्यासाठी मुलांनी प्रयत्न सुरू केले आणि उत्साहाच्या भरात अरमान खान त्या पत्र्याच्या छतावर चढला. मात्र, तिथेच मोठा धोका दडलेला होता. त्या लोखंडी पत्र्याच्या छतावरून हायव्होल्टेज विजेच्या तारा गेल्या होत्या. चेंडू उचलण्याच्या घाईत अरमानचा हात त्या उघड्या तारेला लागला आणि क्षणात मोठा स्फोटासारखा आवाज झाला.

लोखंडी पत्रा आणि विजेचा प्रवाह यामुळे त्याला अतिशय तीव्र धक्का बसला. हा झटका इतका जबरदस्त होता की तो तिथेच गंभीररीत्या भाजला गेला आणि काही क्षणांतच परिस्थिती अत्यंत भीषण बनली. अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग पाहून सोबत खेळणाऱ्या मुलांची बोबडीच वळली. मुलांनी घाबरून मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. विजेचा जबरदस्त धक्का बसल्यानंतर अरमान खान गंभीररीत्या भाजला गेला.

स्थानिकांच्या मदतीने त्याला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. घरी सुखरूप परत येईल, असा विश्वास असलेला आपला मुलगा अचानक अशा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी कळताच अरमानच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!