मुंबईतील बिहार भवनाचा मुद्दा तापणार! राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का?बिहारच्या मंत्र्यांनी डिवचलं


मुंबई :मुंबईत बांधण्यात येणाऱ्या ‘बिहार भवन’वरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का ?. महाराष्ट्रात बिहार भवन कस बांधू देणार नाहीत ? बिहार भवन मी नक्की उभारणार. त्यांच्या या वक्तव्यंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

बिहार सरकारमधील मंत्र्यांनी दिलेल्या या आरोपांना मनसेकडूनही तितकेच ठाम प्रतीउत्तर देण्यात आल आहे.मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी बिहार सरकारवरच बोट ठेवल आहे.आधी स्वतःच राज्य नीट करा. त्यांच्या राज्यातील लोकं बाहेर जातात. त्यांना तिथे थांबवावं. त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करावा. म्हणजे त्यांना कळेल आपली लोक बाहेर का जातात?. त्यांच्या राज्याला महाराष्ट्रावर अवलंबुन राहावं लागतं, ते लागणार नाही” असं उत्तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिलं आहे.

मुंबईत उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पासाठी बिहार सरकारने ३१४ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, मुंबईतील मराठी भाषकांकडून या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत बिहार भवन बांधू,असं बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान मुंबई मध्ये बिहार भवन बांधण्याचे कारण काय? हे त्यांनी स्पष्ट करावं. हा निर्णय जर सांस्कृतिक आदान-प्रदानाचा असता तर आपल्याला चांगलं म्हणता आलं असतं. मात्र यामध्ये राजकीय हेतू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!