बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा तपास संपला अन् पोलीस कर्मचाऱ्यानं मध्यरात्री आयुष्य संपवलं, पुण्यात असं काय घडलं?


पुणे: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड मधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून बीडच्या माजलगाव शहरातील एक तरुणी बेपत्ती झाल्यानंतर तिच्या शोधात एक पोलीस कर्मचारी पुण्याला आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस कर्मचारी पुन्हा बीडला आपल्याला घरी गेला. आणि मध्यरात्री दोन वाजता त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणात पुण्यात असं काय घडलं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण जायभाये (वय 35,रा. बीड) असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. जळगाव शहरातील बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी ते पुणे येथे गेले होते. तपास पूर्ण करून संबंधित काम व्यवस्थित हाताळून रात्री उशिरा पुण्यावरून ते आपल्या घरी परतले होते. मात्र पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

या घटनेनंतर तपास पूर्ण झाल्यानंतर घरी परतलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांसोबत पुण्यात नेमकं काय झालं? असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोणतीही सुसाईड नोट अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे आत्महत्येच गुढ अधिक वाढत चालला आहे.

याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!