अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी जाणून-बुजून लांबवली जातेय ; रोहित पवारांना वेगळीच शंका, VSR कंपनीला…


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी याआधी तीन वेळा पत्रकार परिषदेत घेऊन अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत विमाना अपघाताची चौकशी पुन्हा लांबवली जात असल्याचा संशय आणि शंका व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले की, मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी VSR ला करता यावी म्हणून चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का? त्यांच्या मते, संबंधित विमानाच्या एकूण 5 हजार तासांच्या उड्डाण नोंदींपैकी केवळ 1800 ते 2000 तासांचा रेकॉर्ड VSR कडे उपलब्ध असून उर्वरित सुमारे 3 हजार तासांचा रेकॉर्ड उपलब्ध नाही असे काय आहे का? असे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार असलेल्या कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल, तर याचा अर्थ काय?असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी सीआयडी करत असताना VSR चा मालक भारतात आला असेल, तर याची माहिती त्यांना देणे आवश्यक नव्हते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान अजित दादांच्या विमानअपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे.केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणात अधिक गांभीर्य दाखवावे, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!