नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर ; सिडको अधिकाऱ्यांनी दिली माहिती


मुंबई : गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ चांगले चर्चेत आहे. हे विमानतळ कधी सुरू होणार याची प्रतीक्षा असताना आता विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर गेला असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी हे विमानतळ सुरू होईल, अशी माहिती सिडको अधिकाऱ्यांनी दिली आहे. या विमानतळामुळे मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच मोठा फायदा होणार आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यापारासाठी मोठं केंद्र ठरणार आहे. या विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कनेक्टिव्हिटी वाढणार असून महाराष्ट्रात व्यापाराच्या नव्या संधी वाढून याचा फायदा होईल. केवळ राज्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठीही हे विमानतळा महत्त्वाचं ठरणार असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुरुवातीला हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जून, आधी त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुरू केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. पण आता विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुढे गेली असून ऑक्टोबरमध्ये शुभारंभ होण्याचं सांगण्यात आलं आहे. विमानतळाचं काम पूर्ण न झाल्याने याच्या उद्घाटनाचा मुहुर्त लांबणीवर गेला आहे. त्यामुळे आता यासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!