नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला ; येत्या 8 ऑक्टोंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थित…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या ८ ऑक्टोबरला नवी मुंबई येथून पहिल्या विमानोड्डाणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर हा विमानतळ परिसर ‘सीआयएसएफ’च्या ताब्यात दिला जाणार आहे. त्यानंतर ४५ दिवस विमानतळ आणि परिसराचे स्कॅनिंग करून सदर परिसर ‘सीआयएसएफ’द्वारे सुरक्षित केला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबईतून व्यावसायिक विमानांच्या उड्डाणाला सुरुवात होणार आहे. यासोबतच मुंबईतील मेट्रो-३चे व मेट्रो-२ बीचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान पंतप्रधानांच्या या दौऱ्याची आखणी अंतिम टप्प्यात असून, गुरुवारपासून संबंधित सरकारी विभागांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. एअर इंडिया समूहाने नवी मुंबई विमानतळावरून एअर इंडिया एक्स्प्रेसची २० उड्डाणे होणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. देशातील १५ शहरांसाठी या विमानतळावरून उड्डाणे होणार आहेत. भविष्यात एअर इंडिया समूहाचा या विमानतळावरून ५५ ते ६० उड्डाणे करण्याचा मानस आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!