सिलेंडरमुळे घराला भीषण आग; कुटुंबातिल ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : सिलेंडरमुळे घराला भीषण आग लागल्याने ३ मुलांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जयपूरमधील विश्वकर्मा येथून समोर आली आहे. या घटनेमुळे हळ हळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वकर्माच्या जैसल्या गावात लागलेल्या आगीत तीन निष्पाप मुलांसह संपूर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला. सर्व मृत बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण केले आहे. जयपूर येथील विश्वकर्मा येथे लागलेल्या भीषण आगीत ५ नागरिकांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘विश्वकर्मा, जयपूर येथे लागलेल्या भीषण आगीमुळे ५ नागरिकांच्या अकाली मृत्यूची बातमी हृदयद्रावक आहे. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. जखमींना योग्य उपचार सुविधा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.