हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्यांच्या मानधनातकिमान पंधरा हजारापर्यंत वाढ करावी; आबासाहेब काळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी…


उरुळीकांचन : कुस्ती क्षेत्रामध्ये मानाचा मानला जाणाऱ्या हिंदकेसरी किताब व महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांना पंधरा हजार रुपये मानधन देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय उर्फ आबासाहेब काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

कुस्ती खेळ हा देशाचा मानबिंदू असून महाराष्ट्रातीललोकप्रिय क्रिडाप्रकारातील खेळ आहे. या खेळाची तयारी करण्यासाठी पैलवानांना बालवयापासुन कसरतीचा सामना करुन या खेळात पारंगत व्हावे लागत आहे. या खेळाने राज्याला प्रतिष्ठा मिळून दिल्याने राष्ट्रीय व राज्यस्तरीय हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पैलवानांना उचित मानधन राज्य शासनाने देणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडून सध्या या विजेत्या खेळाडूंना प्रतिमहीना सहा हजार रुपये इतके मानधन देत आहे. मात्र या मानधनात राज्य शासनाने वाढ करुन खेळाडूंचा सन्मान राखावा अशी मागणी आबासाहेब काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

“कुस्तीला महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात सन्मान देण्याची परंपरा आहे. अनेक पैलवानांनी या क्षेत्रामध्ये नावलौकिक करून या क्षेत्राचे व महाराष्ट्र राज्याचे नाव सुवर्ण अक्षरांमध्ये कोरलेले आहे. त्यामध्येच “हिंदकेसरी” हा एक मानाचा किताब मानला जातो. हिंदकेसरी किताब काही ठराविक व नामांकित पैलवानांनी जिंकलेला आहे. हा किताब जिंकून या पैलवानांनी युवा पैलवानांना एक आदर्श घालून दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा योग्य मानधन देऊन योग्य सन्मान दिला पाहिजे”.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!